चंद्रपूर : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू आणि चक्की पिसायला लावू, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. क्रांतीभूमी चिमूर येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

चिमूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राचं सरकार हे तीन रिमोटने चाललंय. त्यामुळे राज्याच्या तिजोरीची लूट चालली आहे, फक्त सत्ताधारी आमदारांचा विकास सुरू आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

काँग्रेसचं सरकार आलं तर भिडे चक्की पिसिंग पिसिंग..!

सोबतच काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेल मध्ये टाकू आणि चक्की पिसायला लावू असा इशारा दिला. महापुरुषांच्या अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले. भिडे यांचा असा एकेरी उल्लेख करीत वडेट्टीवार म्हणाले, मनोहर भिडे उर्फ वळवळणारे किडे हे पोलीस संरक्षणात फिरतात. सरकार बदललं तर, फडवणीस म्हणतात त्याप्रमाणे आम्ही चक्की पिसिंग पिसिंगची वेळ भिडेंवर आणू…

सिडकोला ६० कोटींचा गंडा घातल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
आश्वासने देऊन मोकळं व्हायचं असं सरकारचं काम

दुसरीकडे मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी महायुती सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही, असं म्हणत दुष्काळी मराठवाडा भागात सरकारी घोषणांचा कोरडा पाऊस, अशी खोचक टीका त्यांनी केली. आश्वासने देऊन मोकळं व्हायचं असे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले, असा टोमणाही त्यांनी मारला.

कोरेगाव भीमा आयोग: एसपी, तत्कालीन मुख्य सचिव आणि फडणवीसांची साक्ष महत्वाची : प्रकाश आंबेडकर
मराठवाड्याची जनता माफ करणार नाही…

मराठवाड्यात दुष्काळ घोषित करण्याचे पाऊल सरकारने अद्याप उचललेलं नाही. दोन महिन्यात तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार सरसकट कर्जमुक्तीची घोषणा करेल असं वाटत होतं. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सरकार मराठवाड्यात गेलंय काय? आम्ही सरकारचा निषेध करतोय. मराठवाड्यातील जनता यांना माफ करणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आंदोलनात जाळपोळ करणारे भिडेंचे कार्यकर्ते होते; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here