मुंबई: मुंबईच्या महापौर यांना करोनाची लागण झाली आहे. कोणतीही लक्षणे नसल्यानं त्या होम क्वारंटाइन झाल्या आहेत. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये किशोरी पेडणेकर म्हणतात, ‘मी कोविड अँटिजन चाचणी करून घेतली. ती सकारात्मक आली. कोणतेही लक्षण नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सर्व सदस्यांचीही कोविड चाचणी करून घेतली आहे. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times