भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला एका चेन्नईच्या व्यावसायिकाने गंडा घातल्याचे आता समोर आले आहे. हरभजनने या व्यावसियाकाला चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. पण आता हा व्यावसायिक त्याला पैसे परत करताना दिसत नाही. त्यामुळे हरभजनने चेन्नई सिटी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

वाचा-

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका मित्राच्या माध्यमातून हरभजन हा जी. गणेश या व्यावसायिकाला भेटला होता. त्यानंतर हरभजनने या व्यावसायिकाला २०१५ साली चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर हरभजनने या व्यावसायिकाकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. हरभजनने या व्यावसायिकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हरभजनला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हरभजनने आता न्यायालयातही धाव घेतली आहे.

वाचा-

गेल्या महिन्यात महेश या व्यावसायिकाने हरभजनला २५ लाख रुपयांचा चेक दिला होता. पण या व्यावसायिकाच्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे हा चेक बाऊन्स झाला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हरभजन चेन्नईला गेला होता आणि त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकाला समन्सही बजावले आहेत.

वाचा-

महेश या व्यावसायिकाने आता एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण हरभजनकडून कर्ज घेतले आणि त्यासाठी एक प्रॉपर्टी तारण म्हणूनही ठेवलेली आहे. पण मी हरभजनचे सर्व पैसे परत करेन, असे या व्यावसायिकाने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.

वाचा-

कौटुंबिक कारणांमुळे हरभजन यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरेश रैनाने चेन्नईच्या संघाला सोडचिठ्ठी दिल्यावर हरभजननेही आपण यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे हरभजन सध्याच्या घडीला आपल्या घरी पंजाबमध्येच आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here