म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात कुपोषित बालकांची समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२३ बालके ही तीव्र कुपोषित आहेत तर २ हजार १७४ बालके मध्यम कुपोषित गटात आहेत. कुपोषित बालकांची एकूण संख्या ही अडीच हजारांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती चिंता वाढविणारी आहे, अशी खंत व्यक्त करीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यंत्रणेस कुपोषण निर्मूलनाचे निर्देश दिले.

पवार म्हणाल्या, विशेषत: पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या आदिवासी तालुक्यांमध्ये बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यास कुपोषणमुक्त करण्यासाठी झपाटून कामास लागावे. कृषी योजनांचाही आढावा त्यांनी मांडला. त्या म्हणाल्या, कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. मागील आर्थिक वर्षात ११ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. १ हजार २७७ लाभार्थ्यांपर्यत या योजनचा लाभ पोहचला आहे. याही वर्षात ७ कोटींचा निधी प्राप्त झाला असून १८ लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ प्रदान करण्यात आला आहे.

इथं पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची प्रतिक्षा अन् पावसात वणवण; चंद्रपूरच्या कोलाम बांधवांचा वनवास संपेना

कृषी यांत्रिकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरीत झाला असून ३ हजार लाभार्थ्यांना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे. सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्यासाठी परंपरागत कृषी योजना आत्मा तर्फे राबविण्यात येते यातून आतापर्यंत २३ लाखांचे काम झाले असून, मागील आर्थिक वर्षात ३६८ लाभार्थी तर १०७ लाभार्थ्यांनी या वर्षात लाभ घेतला आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे यातून ६ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला. मृदा स्वास्थ कार्ड योजनच्या माध्यमातून शेतीचा पोत सुधारण्यासाठी मातीचे परिक्षण केले जाते. ३६ हजार ५६९ कार्डचे वाटप मागील वर्षात झाले असून, यावर्षीचा लक्षांक ३८ हजार १५० असून त्यापैकी ३५ हजार ८०० कार्डचे वाटप पूर्ण झाले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परिक्षण करून जमिनीची उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात चार पिंक व्हॅनचे वितरण डॉ. पवार व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल उपस्थित होते.

Raigad Accident: भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here