मुंबई: महादेव जुगार ऍपचा म्होरक्या सौरभ चंद्राकरचा विवाह सोहळा फेब्रुवारीत दुबईमध्ये संपन्न झाला. या आलिशान सोहळ्यावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या सोहळ्याचे काही व्हिडीओ समोर आले. त्यानंतर आता हा संपूर्ण सोहळा आणि त्यातील पाहुणे ईडीच्या रडारवर आहेत. ईडीनं मुंबई, भोपाळ, कोलकात्यात छापे टाकत महादेव जुगार ऍप आणि त्याच्याशी संबंधित अनेकांवर धाडी टाकत ४१७ कोटी रुपये जप्त केले आहेत.

सौरभ चंद्राकरनं विवाह समारंभावर तब्बल २०० कोटी रुपये उडवले. यातील ११२ कोटी रुपये बॉलिवूड कलाकारांवर खर्च करण्यात आले. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील १४ सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये टायगर श्रॉफ, सनी लिऑन, नेहा कक्कर यांच्यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. आता हे सगळेच कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
लग्नाला १४ सेलिब्रिटी, खर्च ११२ कोटी; EDच्या धाडीत ४१७ कोटी जप्त, सौरभ चंद्राकर नेमका कोण?
दुबईहून चालवल्या जाणाऱ्या महादेव जुगार ऍपचा मालक सौरभ चंद्राकर आणि त्याचा व्यावसायिक भागीदार रवी उप्पल यांच्याविरोधात ५ हजार कोटींच्या मनी लॉण्ड्रिंगचे आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. चंद्राकर आणि उप्पल वॉटेंड असून दोघेही छत्तीसगडचे आहेत.

ईडीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२२ रोजी चंद्राकरनं दुबईत एक पार्टी दिली. सप्ततारांकित हॉटेलमध्ये रंगलेल्या पार्टीला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीज उपस्थित होते. त्यांना यासाठी ४० कोटी रुपये देण्यात आले. चंद्राकरचा विवाह फेब्रुवारीत झाला. त्यासाठी त्यानं कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून दुबईला खासगी विमानानं नेलं. बॉलिवूड कलाकार, वेडिंग प्लानर, डान्सर, डेकोरेटर या सगळ्यांना मुंबईहून दुबईला नेण्यात आलं होतं.
ज्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू, जिवंत सापडला तो तरुण; संपूर्ण घटनाक्रम कळताच कुटुंब स्तब्ध
दुबईतील लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी आपली कलाही सादर केली. या कलाकारांमध्ये अतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, एली अवराम, भारती सिंह, सनी लिऑन, भाग्यश्री, पुल्कित, किर्ती खरबंदा, नुसरत भरुचा, कृष्णा अभिषेक या कलाकारांनी हजेरी लावली. या कलाकारांना तब्बल ११२ कोटी रुपये देण्यात आली. ही रक्कम हवालाच्या माध्यमातून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here