म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्हा तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक सखल भागात पाणी शिरले. काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाखालील भागात पूरस्थिती आहे. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, तालुक्यातील गणेशपूर, कारधा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. शहरातील महिला रुग्णालय, बीटीबी भाजी मार्केटमध्ये पुराचे पाणी शिरले.

रेंगेपार गावातील वैनगंगा नदीची पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सुकळी नकुल गावातील पाण्याची पातळी वाढली आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. सखल भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पूरबाधित कुटुंबासाठी जिल्हा प्रशासनाने शिबिर सुरू केले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या शिबिराची पाहणी केली.

नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

चुलबंद नदीपात्रात वाढ

मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीपात्रात मोठी वाढ झाली असून, त्याचा फटका लगतच्या चुलबंद नदी व नाल्यांना बसला. बॅकवॉटरमुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लाखांदूर-वडसा मार्गावरील मडेघाट नाल्याला आलेल्या पुरामुळे धान शेतीत पाणी शिरले आहे. टेंभरी येथील वैनगंगा नदीकाठावरील स्वामी दिनेशानंद महाराज यांच्या आश्रमाला पुराने वेढले आहे. विहीरगाव, टेंभरी, आवळी, खैरी (पट), सावरगाव, आसोला व नदी काठावरील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

भंडारा-बालाघाट वाहतूक बंद

भंडारा-बालाघाट मार्गावरील बपेरा जवळील बावनथडी नदी पुलावर दोन फूट पाणी असल्याने आंतरराज्यीय वाहतूक बंद आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नदीत बुडून इसमाचा मृत्यू

भंडारा : नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली. गजानन शेंडे (वय ५२) रा. भागडी असे मृत इसमाचे नाव आहे. गजानन शेंडे हे गावातील चुलबंद नदीवर आंघोळीसाठी गेले होते. यावेळी त्याचा तोल गेल्याने ते नदीत वाहून गेले.

Raigad Accident: भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here