वृत्तसंस्था, झांझारपूर (बिहार):‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत न आल्यास बिहारच्या सीमेजवळील भाग (सीमंत) घुसखोरांमुळे त्रस्त होईल,’ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिला. भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनी नेपाळ आणि बांगलादेशच्या जवळ असलेल्या बिहारच्या झांझारपूर लोकसभा मतदारसंघातील सभेत हे भाष्य केले.

जवळपास ३० मिनिटे केलेल्या भाषणात गृहमंत्र्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली. सरकारी शाळांच्या सुट्ट्या कमी करण्यासारख्या उपायांद्वारे हे दोघे तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘भावा-बहिणीचा सण असलेला रक्षाबंधन आणि भगवान कृष्णाच्या जन्मदिवस जन्माष्टमी या दिवसांच्या सुट्ट्या इथे रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, तुम्ही विरोध केल्यामुळे राज्य सरकारला आदेश मागे घ्यावा लागला. यासाठी मी बिहारच्या लोकांचे अभिनंदन करू इच्छितो,’ असे शहा या वेळी म्हणाले.

“इंग्रजांनी मिठावर कर लावल्यामुळे गांधींनी सत्याग्रह केला, पण मोदींनी डाळीवर जीएसटी लावला”

‘४० जागा जिंकू’

‘लालू-नितीश ही जोडी बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आली आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीस सरकार पुन्हा निवडून न आल्यास संपूर्ण प्रदेश घुसखोरांनी त्रस्त होईल. अशा स्थितीत बिहारमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतील. तुम्हाला हा परिसर घुसखोरांनी भरलेला असावा असे वाटते का,’ असा प्रश्नही शहा यांनी या वेळी उपस्थित केला. त्याचवेळी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार २०२४मध्येही राज्यातील सर्व ४० जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भंडाऱ्यात मुसळधार, वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, संपूर्ण जिल्ह्याला पुराचा वेढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here