शनिवारी आणि रविवारी सलग सुट्ट्या आणि अवघ्या एका दिवसावर आलेला गणेश उत्सव यासाठी अनेक मुंबईकर नागरिक आपल्या गावी गणपती बसवण्यासाठी येत असतात. एक्स्प्रेसवर नेहमीच वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. कालही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. लांबच्या लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आज सकाळच्या सुमारास लोणावळा जवळ असणाऱ्या बोरघाट परिसरात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू असून चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठी संख्या रस्त्यावर पहायला मिळत आहे.
घाट परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून घाट परिसरात वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करताना प्रवाशी नागरिकांना जाण्यासाठी वेळ लागू शकतो याची काळजी घ्यावी. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक मार्गस्थ करण्याचे काम सुरू आहे.
गणेश उत्सव हा सर्वत्र साजरा केला जातो. मुंबईतअनेक नागरिक नोकरी निमित्ताने राहतात. त्यामुळे अशा उत्सवाला घरी जाणे ते पसंत करतात. त्यासाठी खास सुट्टी घेऊन नागरिक आपल्या गावी येत असतात. त्यामुळे सकाळी प्रवास करणे ते पसंत करतात. मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.