रायपूर: गदर 2 चित्रपट पाहताना हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणाला जीव गमवावा लागला. तरुणानं घोषणा देताच तिथे असलेल्या मित्रांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जीव गेला. खुर्सीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आयटीआय मैदानात ही घटना घडली. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील आयटीआय मैदानात शनिवारी संध्याकाळी दोन तरुण मोबाईलवर अभिनेता सनी देओलचा गदर 2 चित्रपट पाहत होते. चित्रपट पाहताना मलकित सिंहनं एका सीनवेळी हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या एका समुदायाच्या तरुणांनी मलकितला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यामुळे मलकित अर्धमेला झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती बिघडल्यानं त्याला रायपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पहाटे चार वाजता त्यानं अखेरचा श्वास घेतला.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन दुर्ग पोलिसांनी तीन पथकं तयार करुन आरोपींची धरपकड सुरू केली. दुपारी एकपर्यंत सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली. मलकितच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी भरपाई आणि नोकरीची मागणी करत महामार्ग रोखून धरला. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.आयटीआय मैदानात मोबाईलवर चित्रपट पाहत असताना मलकितनं भारत माता की जय, हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणा तिथे असलेल्या एका समुदायाच्या तरुणांना खुपल्या. दारुच्या नशेत असलेल्या तरुणांनी मलकितसोबत वाद घालत त्याला मारहाण सुरू केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here