जयपूर: राजस्थानात भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. महिला अधिकाऱ्यानं एका वर्षात २६ फ्लॅट्स खरेदी केले आणि केवळ दोन दिवसांत या सगळ्यांची नोंदणी करण्यात आली. असं महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या जयपूर सचिवालयात शासन सचिव पदावर कार्यरत आहेत.गेल्या वर्षभरात ज्योती भारद्वाज यांनी २६ फ्लॅट्स खरेदी केले. त्यातील १५ फ्लॅट्सची नोंदणी त्यांच्या स्वत:च्या नावे असून उर्वरित ११ फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठच्या नावे आहे. घटना उघडकीस येताच विकासकानं आपली फसवणूक झाल्याचा दावा केला. प्रकरण कोर्टात असल्याचं सांगितलं. महिला अधिकाऱ्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही.जयपूर सचिवालयात कार्यरत असलेल्या अधिकारी ज्योती भारद्वाज शासन सचिव पदावर कार्यरत आहेत. अलवरमध्ये बऱ्याच कालावधीपासून त्या जिल्हा कोषाधिकारी आणि मत्स्य विद्यापीठात आर्थिक नियंत्रक पदावर कार्यरत राहिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते. त्यात भारद्वाज यांनी तीन घरांचा तपशील दिला होता. यातील एक त्यांच्या पतीच्या नावे होतं. या घरासाठी पतीनं कर्ज घेतलं आहे. तर अन्य दोन घरं त्यांनी स्वत:च्या नावे दाखवली होती.दुसरीकडे सब रजिस्टर कार्यालय जयपूरमध्ये ४ आणि ५ मार्च २०२२ रोजी २६ फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे. त्यांची किंमत ४ कोटी ७१ लाख रुपयांच्या घरात आहे. यासाठी ३० लाख रुपये इतकी रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची चर्चा राज्यभरात सुरू आहे. नोंदणीवेळी फ्लॅट्सची रक्कम धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आली. पण अद्याप धनादेश बँकेत जमा झालेले नाहीत. ५ मार्च २०२२ रोजी ज्योती भारद्वाज यांच्या नावे २.७४ कोटी रुपयांची नोंदणी झाली. या बदल्यात १७.८ लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलं.
Home Maharashtra महिला अधिकाऱ्यानं वर्षभरात २६ फ्लॅट्स घेतले, कोट्यवधी मोजले; २ दिवसांत नोंदणी, एकच...