संतोष शिराळे, सातारा: महादेव कोळी समाजातील सेवासमाप्त कर्मचारी बळवंत पडसरे हे वाई येथे पोलीस म्हणून कार्यरत होते. पडसरे यांच्या एका वर्षाच्या सेवाकार्य कालावधीनंतर पुणे येथील अनुसूचित जमातीच्या पडताळणी समितीने निकाल देऊन त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. त्यामुळे नोकरीसाठी पडसरेंनी ‘ऑफ्रोह’च्या नेतृत्वाखाली उपोषण केले. तसेच पाठपुराव्यानंतर बळवंत पडसरेंना न्याय मिळाला. त्यामुळे ३० ते ३४ वर्षांनंतर का असेना पडसरे यांच्या अंगावर आता पुन्हा पोलिसांची वर्दी दिसणार आहे.

याबाबत माहिती अशी, जावळी तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात राहणाऱ्या महादेव कोळी समाजातील सेवासमाप्त कर्मचारी बळवंत पडसरे हे जिल्हा पोलिस दलात होते. १९८९-९० दरम्यान वाई येथे पोलीस म्हणून कार्यरत असताना एक वर्षाच्या सेवाकार्य कालावधीनंतर पुणे येथील अनुसूचित जमातीच्या पडताळणी समितीने निकाल देऊन त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. जात प्रमाणपत्र पुन्हा मिळावं, यासाठी त्यांनी खूप लढा दिला. पण त्याला यश येत नव्हते. त्यानंतर ते ऑफ्रोह’ संघटनेच्या संपर्कात आले. संघटनेने त्यांना कायम पाठिंबा दिला आणि त्याला यश आले.
एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?
पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी ११ सप्टेंबरला पडसरेंना अधिसंख्य पदाचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांना आता पोलिसाची नोकरी मिळाली आहे. ३० ते ३४ वर्षांनंतर का असेना डिसेंबर २०१९ मधील शासन निर्णयानुसार पडसरेंना न्याय मिळाला आहे. पोलीस अधीक्षकांनी अधिसंख्य पदाचा आदेश दिल्याने पडसरे यांच्या अंगावर आता पोलिसांची वर्दी आली आहे. पण वयोमानाचा विचार करता त्यांची ही वर्दी काही वर्षासाठीच असणार आहे. त्यानंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत. पडसरे आता उरलेल्या कालावधीमध्ये पोलीस दलात कार्यरत राहणार आहेत.
VIDEO: पागल है क्या? शुभमनच्या बोलण्याने चिडला रोहित शर्मा, सगळ्यांसमोर गिलवर ओरडला
पडसरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑफ्रोहचे सातारा जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, सचिव वनदेव ठिगळे, उपाध्यक्ष मच्छींद्रनाथ माने, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा भारती धुमाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, सुरेश गायकवाड यांच्यासह साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Ajit Pawar: वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार- एकनाथ शिंदेंनी…

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत भर रस्त्यात विद्यार्थ्यानं साधलेला संवाद व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here