लंडन: ब्रिटनमध्ये ६० वर्षीय व्यक्तीनं साक्षात मृत्यूचा अनुभव घेतला. मृत्यूनंतर ७ मिनिटांनी तो पुन्हा जिवंत झाला. त्याच्या मृत्यूला डॉक्टरांना दुजोरा दिला होता. पण सात मिनिटांनी त्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. ही घटना चमत्कार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लंडनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत ही घटना घडली. जेवल्यानंतर त्याची हृदयक्रिया बंद पडली. ही घटना ९ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. आता या व्यक्तीनं मृत्यूनंतर अनुभवलेली परिस्थिती सांगितली आहे. त्याचा अनुभव निव्वळ थक्क करणारा आहे.जेरुसलम पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झालेल्या व्यक्तीचं नाव शिव ग्रेवाल आहे. ग्रेवाल यांची हृदयक्रिया बंद पडताच त्यांच्या पत्नीनं रुग्णवाहिकेसाठी फोन केला. रुग्णवाहिका काही वेळात ग्रेवाल यांच्या घरी पोहोचली. त्यात डॉक्टर होते. ग्रेवाल आजही तो दिवस विसरलेले नाहीत. ‘माझा मृत्यू होतोय याची जाणीव मला होती. आपण शरीरातून बाहेर पडत आहोत. एका अलौकिक शून्यावर कब्जा केल्यासारखं वाटत होतं,’ अशा शब्दांत ग्रेवाल यांनी थक्क करणारा अनुभव सांगितला.पाण्यात तरंगतोय आणि कोणतंही वजन जाणवत नाही. शरीर अगदी भारहीन झालंय, असं त्यावेळी जाणवत होतं. काही वेळानं मी चंद्रावर गेलो. मला उल्कापिंड आणि संपूर्ण अंतराळ दिसत होतं. अलौकिक दुनियेत जातेवेळी विविध प्रकारचं जीवन आणि पुनर्जन्माच्या पर्यायांची एक मालिकाच दिसली. त्यावेळी मी अतिशय दृढपणे संसारी जगात परतण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नीला पुन्हा भेटण्याची आणि पुन्हा जगण्याची इच्छा त्यावेळी व्यक्त करत होतो, असा घटनाक्रम त्यांनी कथन केला.डॉक्टर वेळेवर ग्रेवाल यांच्या घरी पोहोचले. सात मिनिटं ग्रेवाल निपचित पडून होते. त्यांच्या शरीराची कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. त्यानंतर त्यांची नाडी काम करु लागली. ग्रेवाल यांना तातडीनं शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं. त्यांची मुख्य धमनी पूर्णपणे ब्लॉक झाली होती. त्यामुळे ब्लॉकेज दूर करण्यासाठी हृदयात स्टेंट लावण्यात आला. हृदय क्रिया बंद पडली तेव्हा त्यांना प्राणवायूची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना सेरेब्रल हायपॉक्सिया झाला. यामुळे त्यांना फेफरं भरलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here