काशिनाथ उर्फ किशोर साताप्पा पाटील (रा. कुरुकली ता. ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावात कापण्यावरून दोघांत वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यातून भर रस्त्यात हल्लेखोराने तरुणाचा खून केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. मयत किशोर यांच्या मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वर्मी घाव घातलेले होते. खून करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर झाला.
आठ दिवसांपूर्वी किशोर व किरण यांच्यात गवत कापण्यावरून आणि जनावरांनी गवत खाल्ल्यावरून वाद झाला होता. सकाळी आजोबांचे अंत्यसंस्कार करून किशोर शेताकडे निघाला होता. त्याची गाडी अडवून ऊस कापणीच्या कोयत्याने किरणने त्याच्यावर सपासप वार केले. मानेवर वार वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार के.डी. माने यांनी भेट देऊन पाहणी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times