नंदुरबार : भारतीय हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्या अलर्टनुसार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक मध्ये पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढल्यानं तापी आणि नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा पुलाला संततधार पावसाने मोठे भगदाड पडलं आहे. यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे. सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिश कालीन पूल बांधण्यात आला होता. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून तापी नदीला मोठा पूर आला. यादरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी प्रशासन आणि पोलीस दाखल झाले असून दोंडाईचा बाजूने पुलाच्या येणाऱ्या भागातील भराव वाहून गेल्याने पुलाला भगदाड पडले आहे.

वाहतूक वळवली

धुळे- नंदुरबार मार्गावरील दोन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा पुलाला भगदाड पडल्यानं वाहतूक थांबवण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहादा तहसीलदार व पोलीस प्रशासनाने धाव घेतली असून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. दोंडाईचा पोलिसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलिसांनी अनरद बारी जवळून वाहतूक वळवली.
पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; गणेशोत्सवानिमित्त अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्गांची संपूर्ण यादी

सारंगखेडा पुलावरील रस्त्याला तडे देखील पडल्याचे चित्रआहे. गेल्याच वर्षी पुल बंद करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती केली होतीअसे असताना भराव वाहून गेल्यानं भगदाड पडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी झालेल्या
तब्बल २३ वर्षांनी भारताने घेतला श्रीलंकेचा बदला, पाहा त्यावेळी नेमकं काय घडलं होतं….
सध्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने पूर परिस्थीती निर्माण झाली. तापी नदीच्या काठच्या गावांना नंदुरबार प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने तापी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याचे चिन्ह दिसून येत आहे.१११ मीटर तापी नदीची धोक्याची पातळी आहे. सध्या ११० मीटर पर्यंत तापी नदीची पातळी सुरू आहे. यामुळं तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
भारत ठरला आशिया किंग! श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय; सिराजनंतर गिल-इशान पडले भारी

अंत्यसंस्कारासाठी १५ तासांची प्रतिक्षा, नाल्यातून दोरीच्या आधारानं अंत्ययात्रा नेण्याची वेळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here