नांदेड: स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील पतीपत्नीचा रविवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील पारवा बुद्रुक गावात ही घटना घडली.
वन विभागाच्या परवानगीशिवाय वन्यप्राण्यांचे प्रजनन; प्राणीसंग्रहालयातील संचालकांवर गुन्हा दाखलमिळालेल्या माहितीनुसार, बालाजी भीमराव माने आणि राधाबाई बालाजी माने असे मृत दांम्पत्याची नावे आहेत. पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने हे आपल्या स्वतःच्या घरी दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री कुटुंबासमवेत जेवण करत होते. त्यांची पत्नी राधाबाई माने ह्या स्वयंपाक करत होत्या. तर इतर तीन सदस्य बाजूच्या रूममध्ये टीव्ही पाहत बसले होते. अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फ़ोटात बालाजी भीमराव माने (५०), राधाबाई बालाजी माने (४५), गजानन बाळाजी माने (२०), मोनिका बालाजी माने (१८), वच्छलाबाई भीमराव माने (५८) इत्यादी जखमी झाले होते. घटनेनंतर घरातील टीव्ही सह इतर साहित्यांचा चुराडा झाला होता.

वडिलांचा राजीनामा, माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंची धाकधूक पुन्हा वाढणार?

घरावरील पत्रे देखील उडून गेले होते. स्फोट झाल्याची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दळवे, तहसीलदार आदित्य शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी सर्वाना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी कुटुंबप्रमुख बालाजी माने आणि त्यांच्या पत्नी राधाबाई माने यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पारवा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. मृत दांम्पत्यांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने माने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here