कोलंबो : मोहम्मद सिराजने एकहाती भारताला सामना जिंकवून दिला. पण आपल्या या यशातचे रहस्य नेमकं आहे तरी काय आणि कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं, याचं उत्तर आता दस्तुरखुद्द सिराजने दिले आहे.सामना संपल्यावर मोहम्मद सिराज म्हणाला की, ” मी काही काळापासून चांगली गोलंदाजी करत आहे. मागील दोन सामन्यांपासून मी फलंदाजांना चकवा देत होतो पण त्यांना बाद करण्यात मला जास्त यश मिळत नव्हते. पण आजच्या सामन्यात मी यशस्वी ठरलो. गेल्या तिन्ही सामन्यांत मी सारखीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या दोन सामन्यांमध्ये चेंडू चांगला सीम होत होता. पण या आजच्या या सामन्यात चेंडू स्विंग होत होता. मी फलंदाजांना जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न केला. कारण तो स्विंग होत होता, त्यामुळे मी चेंडू पुढे टाकण्याचा विचार केला. मी ज्या पद्धतीने विचार केला, तो मी अंमलात आणला आणि योजना यशस्वी झाली. सामना सुरु झाला तेव्हा खेळपट्टीवर चेंडू लवकर चांगला स्विंग होत होता आणि मला वाटले खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे. निश्चितच माझा सर्वोत्तम स्पेल आहे. आतापर्यंची माझी ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे मला तरी वाटते. मला हे रोख पारितोषिक मैदानाच्या खेळाडूंना द्यायचे आहे. कारण यासाठी ते पात्र आहेत. जर ते नसते तर ही स्पर्धा यशस्वी झाली नसती.” गेल्या दोन सामन्यांत चेंडू हा सीम होत होता, पण या सामन्यात चेंडू चांगलाच स्विंग होत होता आणि ही एक गोष्ट सिराजला यश मिळवून देण्यात सर्वात मोलाची ठरली. कारण चेंडू स्विंग होत असल्यामुळेच सिराजला यावेळी हे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. सिराजने आशिया कपच्या फायनलमध्ये अचूक आणि भदक मारा केला. त्याचबरोबर त्याला चेंडू स्विंग होत असल्याचा चांगला फायदा झाला. त्यामुळे जो चेंडू स्विंग होत असल्याचा सिराजला फायदा झाला आणि हेच त्याच्या या यशाचे रहस्य ठरले.