रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे येथे दुचाकीचा मोठा अपघात झाला आहे. मुंबईतील अंधेरी येथून आपल्या गावी संगमेश्वर साडवली येथे निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावर असलेल्या दुभाजकावर दुचाकी आदळून यामध्ये दुचाकी चालक सौरभ सुरेश शिगवण वय २३ या युवकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या दुचाकीवर मागे सौरभ याचा मित्र देवेंद्र सुरेश रावणंग वय २१ वर्षे व्यवसाय नोकरी रा. कर्ली, ता. संगमेश्वर हाही मुंबई अंधेरी येथून गावी येत होता. यावेळी सौरभ हा गाडी चालवत होता. यावेळी त्याचा मागे बसलेला मित्र देवेंद्र हा सुदैवाने बचावला आहे. ऐन गणेशोत्सवात साडवली संगमेश्वर येथील शिगवण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१७ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ०५:३० वाजताच्या सुमारास देवेंद्र आणि त्याचा मित्र सौरभ दोघे दुचाकी घेऊन चालले होते. होंडा-कंपनीची मोटार सायकल गाडी नं. एम एच ०८ / अे ७/ ८३१० घेऊन ते निघाले होते. अंधेरीहून ते संगमेश्वरला दुचाकीवरुन निघाले होते. मौजे असुर्डे बनेवाडी खिंड या ठिकाणी रविवारी ११.४५ वाजता ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना महामार्गावर असलेल्या लोखंडी पत्र्याच्या डिव्हाईडरला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात हे दोघेही तरुण मोटरसायकल वरून उडाले.यावेळी सौरभ लोखंडी डिव्हार्डरच्या मध्यभागी पडला त्या अपघातात सौरभ याच्यावर डोक्याला आणि अन्यत्र गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यावेळी महामार्गावर असलेल्या रुग्णवाहिकेने सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सौरभला तात्काळ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सौरभ याला तपासून मृत घोषित केले.
युवा शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पॅशन फ्रुटची लागवड सक्सेसफुल, ऑनलाइन विक्रीचं प्लॅनिंग, लाखोंच्या उत्पन्नाची हमी
या अपघाताचे वृत्त कळताच तात्काळ महामार्ग पोलीस व सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याप्रकरणी अधिक तपास सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड हे करत आहेत.
शिक्षकाने नवीकोरी कार घेतली, पण पाचव्याच दिवशी घात झाला; सासरी जाताच थेट विहिरीत कोसळले!
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी अवजड वाहने रस्त्यावर येऊ नये. यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. महामार्गावर बंदीचा नियम तोडणाऱ्या दहा ते बारा अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मोहम्मद सिराजने सांगितलं यशाचे रहस्य, कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं जाणून घ्या…

पर्यायी मार्ग, सुविधा केंद्र; गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here