सातारा : सातारा- पुणे मार्गावर खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला असून या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा, भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर शिरवळ येथून वाहतूक वळवण्यात आली आहे.

पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असून, तासभर तरी टोलनाक्यावरून वाहनांची सुटका होत नाही. महामार्गावरील खेड शिवापूर, आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर सुमारे दोन ते अडीच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले होते. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटात वाहनांचा चक्काजाम झाला होता. ३०० ते ४०० गाड्या उभ्या असल्याने सगळ्या घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही कोंडी दूर करण्यासाठी शिरवळ येथून पंढरपूर फाट्यावरून लोणंद मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

बबनराव घोलप प्रकाश आंबेडकरांच्या तर मुलगा शरद पवारांच्या भेटीला… घोलपांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

पुणे आणि मुंबईवरून गणेशोत्सवासाठी एकाच वेळी गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांनी गर्दी केल्याने पुणे- सातारा महामार्गावर, खंबाटकी घाटात व आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबई, पुण्याकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव व कोकणात जाणाऱ्या – येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहनांची होणारी गर्दी पाहता आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू केल्या आहेत. तसेच मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार सायंकाळपासून महामार्गावर वाहतूक वर्दळ वाढली आहे. ती रात्री उशिरापर्यंत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने विभागातून जादा बसेसचे नियोजन केले आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. महामार्गावर खंबाटकी घाट, आनेवाडी व तासवडे टोल नाका येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here