म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘गणेशोत्सव असेल किंवा कोणत्याही जयंती असतील, त्या एका दिवसापुरत्या साजऱ्या कराव्यात. उत्सवाचे उर्वरित सर्व दिवस देशकार्यासाठी उपक्रम राबवावेत. ते उपक्रम गणपतीच्या नावे किंवा कोणत्याही महापुरुषाच्या नावे करा; पण त्याचा देशासाठी वापर करा,’ असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील युवा अभ्यासक डॉ. सूरज एंगडे यांनी रविवारी केले. ‘तरुणांनी चळवळीत आल्याशिवाय बदल घडणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले. डॉ. एंगडे यांनी लिहिलेल्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. या निमित्ताने मेहता पब्लिशिंग हाउसच्या ग्रंथदालनात ‘थेट भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. एंगडे यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधला. ‘जगभरात कम्युनिस्ट सत्ता असलेल्या देशांमध्ये १८, १९ वयाचे तरुण देशकार्यासाठी काम करतात; पण भारतातले तरुण याच वयात उत्सव, जयंती साजरे करीत बसतात. याचा विचार तरुणांनीच करायला हवा,’ असे डॉ. एंगडे यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस बोलून झाले मोकळे, मराठवाड्यातील जनतेच्या हाती फक्त भोपळे: नाना पटोले ‘सण उत्सवाच्या काळात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. राज्यातील तरुणांनी एक दिवस गणेशोत्सव साजरा करून नऊ दिवस सरकार पोहचले नाही, अशा ठिकाणी जाऊन रस्ते, पूल, शाळा, दवाखाने उभारणे आणि या पायाभूत सार्वजनिक सोयी सक्षम करण्याचे काम करावे. गणेशभक्तांनी हे गणेशाच्या नावानेच करावे. पण, विधायक कामे केली पाहिजेत’
काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये चक्की पिसायला लावू : विजय वडेट्टीवार ‘कोणत्याही विचारांशी संबंधित चळवळ जिवंत ठेवायची असेल, तर तरुणांना त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. किनाऱ्यावर बसून दुसऱ्याला नाव चालवण्याची सूचना देणारे मूर्ख असतात. चळवळीचेही तसेच आहे. बाहेर राहून केवळ चर्चा करून चळवळ सक्षम होणार नाही. त्यात तरुणांना उतरावे लागेल. कॉर्पोरेटपासून कोणत्याही क्षेत्रातील जातीयवाद संपवण्यासाठी बहुजनांना उच्चपदापर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठी बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करून आपले स्थान तरुणांनी निर्माण करावे,’ अशी सूचनाही एंगडे यांनी केली.