वाचा: ‘
मुंबईबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कंगनाविरोधात शिवसेनेनं जोरदार आघाडी उघडली आहे. सुरुवातीला हा वाद शाब्दिक युद्धापर्यंत मर्यादित होता. मात्र, शिवसेनेनं कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्यामुळं शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्ष भाजप उघडपणे कंगनाच्या बाजू घेत शिवसेनेला घेरलं आहे. महापालिकेच्या कारवाईची वेळ चुकल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेली आहे.
वाचा:
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेनं कंगनाच्या विरोधात कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र, कंगना रोजच्या रोज ट्वीट करून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे. कालही तिनं मुख्यमंत्र्यांविरोधात एकेरी भाषा वापरली होती. तसंच, महापालिकेच्या कारवाईविरोधात तिनं न्यायालयातही धाव घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी कळवली आहे. त्यामुळं या वादाला पुरतं राजकीय स्वरूप आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यात खलबतं होत आहेत. संजय राऊत हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक असल्यामुळं उद्धव ठाकरे त्यांना नेमके काय आदेश देतात याकडं लक्ष लागलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times