नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO प्रत्येक आर्थिक वर्षासाठी व्याजदर सुधारित करते. पीएफ खातेधारकांना संबंधित आर्थिक वर्षात त्यांच्या ठेवींवर व्याज दिले जाते, पण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी व्याजदर जाहीर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ईपीएफओ तोट्यात आहे का?
मीडिया रिपोर्ट्सनुसार EPF संस्था तोट्यात गेली आहे. EPFO हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि सध्या ईपीएफओचे ७ कोटींहून अधिक सदस्य आहेत. EPFO कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना व्यवस्थापित करते. २०२१-२ या आर्थिक वर्षात ईपीएफओची सरप्लस ४४९.३४ कोटी रुपये होती, तर या आर्थिक वर्षात ईपीएफओने १९७.७२ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला असून त्यानंतर पीएफवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EPF सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट; फक्त एक चूक… अन् पेन्शन आणि 7 लाखांचा विमा गमावून बसाल
पीएफ व्याजदर कमी होणार?
येत्या काही दिवसांत पीएफवरील व्याज कमी होण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेचा एकमेव आधार कमकुवत होऊ शकतो. सध्या पीएफवर ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ८.१५% व्याजदर निश्चित केला आहे.

Explainer : नोकरदारांसाठी महत्त्वाचे! EPF खात्यातील माहिती अपडेट कशी करायची? जाणून घ्या स्टेप्स
सध्या पीएफवर मिळालेल्या व्याजाची बाजाराशी तुलना केली तर ते खरोखरच जास्त आहे. तर अल्पबचत योजनांमध्ये फक्त एक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्या पीएफपेक्षा जास्त (८.२० टक्के) व्याज मिळत आहे.

तुमचा PF कापला जात आहे तर ‘या’ गोष्टी तत्काळ करा दुरूस्त, नाहीतर होऊ शकते तुमचे आर्थिक नुकसान
PF खात्याची माहिती अपडेट करा
ईपीएफओने अलीकडेच सदस्यांच्या खात्यांमधील नाव, आधार क्रमांकासह एकूण ११ माहिती अपडेट करण्यासाठी नवीन प्रक्रिया जारी केली. संस्थेने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार नाव, लिंग, जन्मतारीख, वडिलांचे नाव, नातेसंबंध, वैवाहिक स्थिती, जॉईन होण्याची तारीख, बाहेर पडण्याचे कारण, बाहेर पडण्याची तारीख, राष्ट्रीयत्व आणि आधार क्रमांक अपडेट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here