कल्याण : आता धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. माझ्या निधीच्या फाईल्स कोणाच्या टेबलखाली दाबून ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर सर्व सण येत आहे. पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची मदत ही जनतेला मिळाली पाहिजे. मात्र शिवसेनेच्या पदाधिकारी गुंडांना चार चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. तुमच्या प्रत्येक आरोपांचं उत्तर देतो, अशी टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलीये. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला लक्ष्य केलं.

कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवारी ( १७ सप्टेंबर ) पार पडला. यावेळी गपणत गायकवाड बोलत होते. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोरच आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं.

आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की , त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहेत. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन. कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचं आता नाव घेत नाही. मात्र, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. पण, माझा निधी कोणाच्या कोणाच्या टेबलवर अडवून ठेवला होता, हेही जनतेला सांगणार आहे. कल्याण पूर्वमध्ये १२९ कोटींची कामे मी मंजूर करून आणली होती. परंतु, दुसऱ्यांचं नाव लावून ही कामे चालू आहेत, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला.

डाव्यांची सत्ता असलेल्या देशात तरुण पोरं देशकार्य करतात, भारतातली पोरं उत्सव-जयंती साजरे करण्यात व्यस्त: सूरज एंगडे
शिवसेनेच्या लोकांनी बाग, मैदानांच्या जागेवर अनधिकृत बांधकामे केली. तीच शिवसेना सांगते, आमदार गणपत गायकवाड काय काम करतात? तुमची अनधिकृत बांधकामे हटवून आरक्षित जागा मोकळ्या करा, असं आव्हान गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलं.

काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये चक्की पिसायला लावू : विजय वडेट्टीवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मंजूऱ्या मी घेतल्या. पण, तिथेही श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचं असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही, एवढे पुरावे माझ्याकडे आहेत, असेही गणपत गायकवाड यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here