मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेगाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने नवे फलाट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटीमध्ये दोन नव्या फलाटांसह ४ स्टेबलिंग मार्गिका अर्थात रेल्वेगाड्या उभ्या करण्यात येत आहे. प्रकल्पाचे १०० मीटर लांबीच्या मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

सध्या फलाट – ५

नव्या फलाटानंतर एकूण संख्या – ७

खर्च – ६४.१० कोटी रुपये

कामाची सद्यस्थिती – ३५ टक्के काम पूर्ण

कालमर्यादा – २०२४

सध्या रोजची रेल्वे वाहतूक – २५ मेल-एक्स्प्रेस जोड्या

प्रवासी – रोज ३० ते ३५ हजार

प्रवेशद्वार – ८

डाव्यांची सत्ता असलेल्या देशात तरुण पोरं देशकार्य करतात, भारतातली पोरं उत्सव-जयंती साजरे करण्यात व्यस्त: सूरज एंगडे
… असे असतील फलाट

-सध्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर मेल एक्सप्रेससाठी ५ फलाट आहेत.

– प्रत्येक फलाट १० मीटर रुंदीआणि ९६० मीटर लांबीचे आहेत.

– २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या वाहतुकीसाठी फलाट पूरक आहेत.

– सध्या २ नवे फलाट आणि ४ स्टेबलिंग मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे.

… ही कामे पूर्ण

-पाइल फाउंडेशनसह १०० मीटर लांबीच्या पिटलाइनचे बांधकाम पूर्ण झाले. पिटलाइनचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केला जातो.

-२.२५ लाख लिटर क्षमतेच्या दोन छतावरील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यापैकी एका टाकीचे काम पूर्ण झाले असून अन्य टाकीचे काम सुरू आहे.

-४.५ लाख लिटर भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण.

– ४ जुने स्टेबलिंग साइडिंग पाडण्याचे काम पूर्ण झाले आहे.

– कॅन्टीन इमारतीचे बांधकाम, १२०० चौरस मीटर गॅरेजचे काम पूर्ण.

-प्रस्तावित नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ६/७ च्या ७३१ मीटर लांबीच्या फलाटापैकी ६०२ मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

-१२०० मीटरपैकी ७२९ मीटर फलाट भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले

… ही कामे सुरू

– नव्या दोन फलाटांवरील कव्हर ओव्हर शेडचे काम सुरू आहे.

– ७,००० चौरस मीटर डांबरी रस्त्यांची तरतूद असून ते उभारणीचे काम सुरू आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर दोन नवीन फलाट पूर्ण झाल्यामुळे २४ डब्यांच्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्यास मदत होणार आहे. स्टेबलिंग मार्गिकामुळे यार्डमधील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

– डॉ. शिवराज मानसपुरे

मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

‘ती’ २.७५ लाख मतं मिळून एकूण ६ लाख! गणित मांडत राणेंचा दावा; शिंदेंच्या शिलेदाराची गोची?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here