कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने कारवाई केली. त्यानंतर कंगनाने महापालिकेवर आरोप केले होते. मुंबई हायकोर्टात आज झालेल्या सुनावणीवेळी महापालिकेने कंगनाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘बंगल्यावरील कारवाई कुहेतूने केल्याचे कंगनाने मुंबई महापालिकेवर केलेले आरोप हे निराधार आणि चुकीचे आहेत. तिच्या मालमत्तेवर नियमानुसारच कारवाई केली आहे. त्यामुळे तिला हायकोर्टात येऊन तिच्या चुकीच्या कृतींना संरक्षण मिळू देण्याची परवानगी कोर्टाने देता कामा नये,” असे उत्तर मुंबई महापालिकेने हायकोर्टात दिले आहे.
तर “अनेक गोष्टी आम्हाला रेकॉर्डवर आणायच्या आहेत. मागील २ वर्षांपासून महापालिकेसोबत आमचे पत्रव्यवहार झाले आहेत. कंगनाशी काल सविस्तर बोलून माहिती घेता येऊ शकली नाही. त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्यासाठी आणि अतिरिक्त प्रतिज्ञापत्र करण्यासाठी थोडी मुदत द्यावी”, अशी विनंती कंगनाचे वकील अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी केली. त्यामुळे त्यांना सोमवार, १४ सप्टेंबरपर्यंत आणि त्यावर शुक्रवार, १८ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास मुदत देऊन न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने पुढची सुनावणी २२ सप्टेंबरला ठेवली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times