म.टा.प्रतिनिधी, पुणे : हडपसर रेल्वे स्टेशन पुण्याचे ‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या कामासाठी १३५ कोटी रुपये मंजूर झाले असून, आतापर्यंत ३० टक्के टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामासह प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने कामे प्रगतिपथावर आहेत. पुण्याला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे टर्मिनलचा विकास करण्यात येत आहे. येथून सध्या केवळ हैदराबाद एक्स्प्रेसच धावते. भविष्यात या ठिकाणाहून गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून कामे सुरू आहेत. या टर्मिनलसाठी आवश्यक जागा मिळविण्याची प्रक्रियाही पूर्ण होत आहे.

टर्मिनलची होणारी कामे

– अप आणि डाउन प्लॅटफॉर्मचा ६०० मीटरपर्यंत विस्तार.

– विद्यमान ‘यूपी गुड्स लाइन’चे रूपांतर अप आणि डाउन कॉमन पॅसेंजर कोचिंग लाइनमध्ये होणार.

– नवीन स्टेशन इमारतीचे बांधकाम.

– प्रसरण क्षेत्र, पार्किंगची तरतूद.

– पाणीपुरवठा टाकीची व्यवस्था.

Mohan Bhagwat: मार्क्सवाद्यांच्या विचारधारेचे स्मशान तयार, त्यांची उत्तरक्रिया आपल्यालाच करायची आहे: मोहन भागवत
पूर्ण झालेली, प्रगतिपथावरील कामे

– प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन आणि तीनवर २४ डब्यांची लांबी पूर्ण.

– प्रस्तावित सुविधांसह ~ ११.६९ कोटींच्या सुविधा प्रगतिपथावर.

– सामान्य वेटिंग हॉल

– एक्झिक्युटिव्ह लाउंज

– बुकिंग ऑफिसचे पाच काउंटर

– चौकशी काउंटर

– प्लॅटफॉर्मवर ८०० मीटर लांब कव्हर शेड

– पाण्याची व्यवस्था

– सार्वजनिक घोषणा प्रणाली

– प्रवाशांसाठी रिटायरिंग रूम

– टीटीई कार्यालय आणि विश्रांती कक्ष

– लगेज ऑफिस आणि क्लॉक रूम आणि पार्सल ऑफिस

– आरपीएफ कार्यालय, जीआरपी कार्यालय

– आरक्षण काउंटर

– इलेक्ट्रिक सबस्टेशन इमारत

– कुली खोली

– परिभ्रमण क्षेत्र, पार्किंग

– रस्ता रुंदीकरण

– सध्याचे क्वार्टर आणि जुनी स्टेशन इमारत पाडणे.

मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही, एकदा लोकसभा होऊन जाऊ द्या… भाजप आमदाराचा श्रीकांत शिंदेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here