Nashik Chandwad Car and Container Accident Four Death Including a Corporator; भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू; भाजप नगरसेवकाचा समावेश
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कार-कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवड जवळ असलेल्या नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार ठार जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते. अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भीषण अपघातात धुळ्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेले किरण अहिरराव (प्रभाग क्र.७) आणि त्यांच्या मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. येथे मदतकार्य सुरु झाले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.
मयतांची नावे
१. किरण हरीचंद्र अहिराव २. अनिल विष्णू पाटील ३. कृष्णकांत चिंधा माळी ४. प्रवीण मधुकर पवार