मुंबई : ऑटो क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना धमाकेदार रिटर्न्स दिले आहेत. एकेकाळी अवघ्या अडीच रुपयात मिळणाऱ्या या स्टॉकमध्ये पैसे गुंतवून लोक करोडपती झाले आहेत असे म्हटले तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. तथापि दीर्घकाळात शेअरधारकांना श्रीमंत करणारा हा शेअर आता विकण्याचा सल्ला बाजार तज्ज्ञ देत आहेत. शेअरमधील विक्रमी दर वाढीनंतर आता बाजाराची माहिती घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला जात आहे, चला जाणून घेऊया का?श्रीमंत करणारा मल्टीबॅगर स्टॉकराइड कंट्रोल उत्पादने निर्मात्या गॅब्रिएलचे शेअर्स या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते मात्र, आ स्टॉक उच्चांकावरून ६% हून अधिक खाली घसरले आहेत. तथापि दीर्घकालीन अवघ्या २.५ रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले असून सद्यस्थितीत ब्रोकर्स तातडीने विक्री करण्याचा सल्ला देत आहेत.देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबाच्या मते सध्याच्या पातळीपासून १३% हून अधिक घसरू शकते. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या ३१७.४५ रुपये असून कंपनीचे मार्केट कॅप ४,५५९.९८ कोटी रुपये आहे.अडीच रुपयांच्या शेअरने मालामालमनी कंट्रोलच्या अहवालानुसार २० वर्षांपूर्वी गॅब्रिएल इंडियाचे शेअर्स अडीच रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते, तर २० सप्टेंबर २००२ रोजी शेअर्सची किंमत २.६० रुपये होती पण आता किंमत ३१७.५५ रुपयाच्या पातळीवर पोहोचले आहेत म्हणजेच या काळात शेअरने १२११० टक्के परतावा दिला आहे.अशा परिस्थितीत एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअर्समध्ये ८२ हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य एक कोटी रुपये झाले असते. विशेष म्हणजे फक्त दीर्घकाळच नाही तर अल्पावधीत देखील या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शेअरची किंमत १२९ रुपये होती आणि अवघ्या सहा महिन्यांत स्टॉकने ३०० रुपयांच्या वर उडी घेतली आहे.विक्रमी उच्चांकानंतर मोठी घसरण३३८ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गॅब्रिएल इंडियाच्या शेअरची किंमत ६% घसरली असून यानंतर जिओजित बीएनपी परिबाने आणखी शेअर १३% घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ब्रोकरेजने म्हटले की या शेअरची किंमत एक वर्षाच्या फॉरवर्ड बेसिसवर २५ पट पुढे आहे, त्यामुळे मध्यम मुदतीत एकत्रीकरणाची आशा आहे. अशा स्थितीत या गोष्टी लक्षात घेऊन ब्रोकरेजने स्टॉकवर २७५ रुपये लक्ष्य किंमत निश्चित करत विक्री (Sell) रेटिंग दिले आहे.(Disclaimer: वर नमूद स्टॉकची माहिती ब्रोकरेजच्या सल्ल्यानुसार आहे. तुम्हाला यापैकी कोणत्याही मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी महाराष्ट्र टाइम्स जबाबदार राहणार नाही.)
Home Maharashtra अवघ्या अडीच रुपयांचा होता शेअर, आज गुंतवणूकदारांनी छापल्या नोटा; लेटेस्ट अपडेट वाचून...