नाशिक : नाशिकमधून (Nashik) भीषण अपघाताची बातमी समोर येत असून चांदवडजवळ (Chandwad) कार -कंटेनरच्या भीषण अपघातात (Major Accident) चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे. चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील (Dhule) रहिवासी असल्याची माहिती आहे. 

धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्यू

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सातत्याने अपघाताच्या घटना समोर (Nashik Accident) येत असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ भीषण अपघात झाला आहे. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. यावेळी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत सर्व धुळे जिल्ह्यातील असून या अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक

दरम्यान धुळे येथील चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात धुळे येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. मात्र इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मृतांची अजून ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Car Accident : गुजरातचं मित्रमंडळ इगतपुरीला फिरायला आलं, मात्र परतताना ओव्हरटेक करणं नडलं, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here