भोपाळ: माणूस आणि पाळीव कुत्र्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकले असतील. पण मध्य प्रदेशच्या रीवामध्ये एक चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. कुत्र्याच्या मालकाच्या हट्टामुळे पोलिसांना कबर खणावी लागली. नसबंदीच्या शस्त्रक्रियेदरम्यान प्राण्यांच्या रुग्णालयात झाल्यानंतर एकच गोंधळ झाला होता. आता या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.घटना पशु वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक के के सिंह त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन नसबंदीसाठी रुग्णालयात गेले होते. डॉक्टरांनी आवश्यक तपासण्या करुन त्याला शस्त्रक्रियेसाठी नेलं. बाहेर आणलं तेव्हा कुत्र्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे कुत्रा दगावल्याचा आरोप करत सिंह यांनी अमहिया पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.मरण पावलेला कुत्रा आमच्यासाठी घरातील सदस्यासारखा होता. चार वर्षांपूर्वी माझ्या मुलानं त्याच्या आईला म्हणजेच माझ्या पत्नीला वाढदिनी कुत्रा भेट म्हणून दिला होता. त्यानंतर आम्ही एक मादी श्वानही घरात आणली. घरात कुत्र्यांची संख्या वाढल्यानं आम्ही कुत्र्याची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता, असं सिंह यांनी सांगितलं.डॉक्टरांनी कुत्र्याची शस्त्रक्रिया केली. पण त्यानंतर लगेचच कुत्र्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यापूर्वीच त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. पोलिसांनी कारवाईसाठी शवविच्छेदन अहवाल मागितला. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत कुत्र्याचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रीवा पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here