पुणे : पुण्यात नेहमी काही ना काही घडत असतं. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की, विचारता सोय नाही. अशीच एक संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. एका ३० वर्षाच्या नराधमाने एका ४ वर्षीय बलिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. अंगणात खेळत असताना पीडित बालिकेला अंधारात आडोशाला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी जोरात ओरडून रडायला लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी आरोपीला पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर कॉलनी, बोराटे चाळ, कोथरुड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पीडितेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वत:ला मोठा नेता म्हणताय, पक्ष फोडलात, आता हे पाप तरी करू नका, वडेट्टीवारांचा संताप, अजितदादांना सुनावलं
चार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. चोरगेने या मुलीला फिरायला नेतो, असे सांगून नेले. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ तिला नेले. अंधारात तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आजोबा तेथे गेले. परिसरातील रहिवासी आणि आजोबांनी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या प्रकरणाचा साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Nashik: कंटेनरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा, पत्र्याचा चेंडूसारखा गोळा; भाजप नगरसेवकाचा शेवटचा प्रवास ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here