मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय कितपत व्यवहार्य ठरु शकतो, हे आम्ही तपासून पाहू. त्यानंतर संबंधित परिसरात शेअरिंग रिक्षा, टॅक्सीमुळे वाहतुकीची समस्या उद्भवणार नसेल तर आम्ही मेट्रो स्थानकांच्या परिसरात रिक्षा आणि टॅक्सी स्टँड सुरु करण्याची परवानगी देऊ, अशी माहिती ‘एमएमआरटीए’च्या एका अधिकाऱ्याने दिली.
प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणाऱ्या या रिक्षा आणि टॅक्सी स्टँडसाठी ‘एमएमआरटीए’ने २८ मेट्रो स्थानके निश्चित केली आहेत. यापैकी काही मेट्रो स्थानकांसाठी एक तर जास्त रहदारी असलेल्या मेट्रो स्थानकांसाठी रिक्षा आणि टॅक्सीचे तीन मार्ग निश्चित करण्यात येतील. लवकरच ‘एमएमआरटीए’कडून ४० पेक्षा अधिक शेअर रिक्षा-टॅक्सी मार्गांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही ठिकाणे शक्यतो मेट्रो स्थानकांपासून जवळ असणारी कार्यालयीन ठिकाणे किंवा जास्त लोकसंख्येच्या रहिवाशी वस्त्या असतील. वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांबाहेर ही सेवा सुरु करण्यात येईल. याशिवाय, अंधेरी पश्चिम ते दहिसह या मेट्रो-२अ च्या मार्गावर, तसेच गुंदवली ते दहिसर या मेट्रो मार्गावरील स्थानकांबाहेरही शेअरिंग रिक्षा-टॅक्सीची सेवा सुरु करण्यात येईल.
कोणत्या मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा-टॅक्सी स्टँड सुरु होणार?
वर्सोवा, डी.एन. नगर, अंधेरी, चकाला, गोरेगाव, आरे, दिंडोशी, आकुर्ली, पोयसर, मागाठणे, कांदिवली, डहाणूकरवाडी, ओवारीपाडा, दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदारपाडा , मालाड पश्चिम, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली, शिंपोली.