सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सत्ताधारी पक्षातील खासदारांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा मुद्दा मांडला. माझे त्यांना पूर्णपणे समर्थन आहे. कारण पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे की, याची तातडीने चौकशी करावी. या चौकशीला आमचे पूर्ण समर्थन असेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपची कोंडी केली.नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. आजची भाजपा पाहिली तर सर्वात जास्त सदस्य हे काँग्रेसमधून तिकडे गेलेले आहेत. तुम्ही साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी नेहमी म्हणत असतात. पण साठ वर्षात आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले खासदारच आज सत्ताधाऱ्यांकडे गेलेले आहेत, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला. आपण संसदेत देशाची सेवा करण्यासाठी आलेले आहोत. सोमनाथ चॅटर्जी यांनी देखील संसदेत व्यापक चर्चा व्हायला हवी असेच मत व्यक्त केले होते. मी भाग्यवान आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातील व महाराष्ट्रातील जनतेने मला या संसदेतील सदस्य होण्याची संधी दिली. त्यामुळे नियमांच्या अधीन राहून मी माझे काम करत राहीन असा विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या.