नवी दिल्ली : भारताने आशिया कप जिंकला. श्रीलंकेला धुळ चारली आणि न भुतो न भविष्यती असा विजय मिळवला. या विजयाानंतर भारताते माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.गावस्कर यांनी एका वृत्तपत्राच्या स्तंभात लिहिले आहे की, ” श्रीलंकेविरुद्ध भारताला २१३ धावा करता आल्या. त्यानंतर भारतीय संघ हा सामना जाणून बुजून हरण्याचा प्रयत्न करत आहे, अशी ओरड पश्चिम सीमेपलीकडील (पाकिस्तान) सर्व लोकांनी केली. पण हे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत. भारत श्रीलंकेकडून हरला असता आणि त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला. त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाहून गेला, तर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नसता, अशी शक्यताही लोक विचार करतात. ही समीकरणे असूनही भारत मुद्दाम का हरेल? त्यामुळे ही लोकं किती मुर्ख आहेत, याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. त्यामुळे जी लोकं अशी ओरड करत होती त्यांच्या चेहऱ्यावर ही एक जोरदार चपराक आहे. ” भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विक्रमी आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याचा आनंद साजरा केला. विश्वचषकापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या या विजयावर आनंदीत दिसले. या दिग्गज फलंदाजाने रोहित शर्मा आणि कंपनीला श्रीलंकेविरुद्धचा सुपर-४ सामना जाणूनबुजून हरवायचा होता, जेणेकरून पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढता येईल असा आरोप करणाऱ्यांना फटकारले. गेल्या बुधवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धेतील एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. ड्युनिथ वेललागेच्या फिरकीमुळे भारताचा डाव अवघ्या २१३ धावांवर आटोपला. त्यानंतर वेललागे आणि धनंजय डी सिल्वा यांनी फलंदाजी करताना भारतावर दडपण निर्माण केले होते. पण शेवटी भारताचा विजय झाला. त्यामुळे तिथेच खरं तर पाकिस्तानच्या चाहत्यांना एक चपराक बसली होती. पण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यांनी श्रीलंकेवर विजय मिळवल्यावर तर पाकिस्तानच्या चाहत्यांना जोरदार चपराक बसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here