आणि शिंजो आबे यांच्यात झालेल्या चर्चेत दोघांनीही परस्पर विश्वास आणि मैत्रीवर भर दिला. एकमेकांच्या भेटींचे अनुभवही आठवले. त्याचबरोबर भारत-जपान विशेष रणनितीक आणि जागतिक भागीदारीनुसार उभय देशांच्या नेत्यांनी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या (MAHSR) प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे पदाचा राजीनामा देणार आहेत. पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांनी करोनाच्या मुद्द्यावर चर्चा केली. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम आणि स्थिर भागीदारीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
संरक्षण सहकार्य
याव्यतिरिक्त, दोन्ही नेत्यांनी भारतीय सैन्य आणि जपानी आत्मरक्षा दल यांच्यात पुरवठा आणि सेवांच्या परस्पर सहकार्यांच्या तरतूदीवरील करारावर स्वाक्षऱ्या केल्याने याचे स्वागत केले. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक व्यापक होईल आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेला हातभार लागेल, असं त्यांनी मान्य केलं.
घट्ट संबंध
करोना व्हायरस संसर्गाच्या काळात एकमेकांच्या देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल दोन्ही देशांच्या नेत्यांनी कौतुक व्यक्त केलं. तसंच दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत यावरही सहमती व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत भारत-जपान भागीदारीने मिळवलेली भक्कम गती भविष्यातही कायम राहील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी जपानच्या नवीन सरकारसोबत काम करण्याचा आपला उद्देश व्यक्त केला आणि पंतप्रधान आबे यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times