मुंबई : मुंबई विशेष सत्र न्यायालयानं अमृता फडणवीस यांना लाच देऊ करून अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानी याला जामीन मंजूर केला आहे. जयसिघांनी या प्रकरणात २० मार्चपासून अटकेत होता. अनिल जयसिंघानी याला खंडणी प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायद्याअन्वये अटक करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देऊ करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनला २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी विरोधात एफआयआर दाखल झाला होता. यामध्ये त्याच्या मुली विरोधात देखील तक्रार देण्यात आली होती. अमृता फडणवीस यांच्याशी संबंधित कथितपणे ऑडिओ क्लीप जाहीर करण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी विरोधात गुन्हेगारी कट रचणे, खंडणी मागणे यासाठी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष सत्र न्यायालयात एसीबीच्यावतीनं अजय मिसार यांनी अनिल जयसिंघानींच्या जामीनाला विरोध केला. तर जयसिंघानीच्यावतीनं सुदीप पस्बोला यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी आज अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर केला. अनिल जयसिंघानीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात यावं, असे आदेश न्यायालयानं तपास अधिकारी रवी सरदेसाई यांना दिले. कोर्टात दररोज हजेरी लावणे, साक्षीदारांना न धमकावणे, अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एकमेकांना आधार द्या, या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत; आपल्यात तशी पद्धत नाही-अजित पवार

जयसिंघानी याचा पासपोर्ट यापूर्वीच पोलिसांकडे देण्यात आलेला आहे. परवानगीशिवाय भारत सोडून जाऊ नये, असं आदेशात म्हटलं आहे.
जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला १७ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तिला २७ मार्चला सत्र न्यायालयानं जामीन दिला होता.
गुड न्यूज, मध्य रेल्वे गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्यांना होणार फायदा

अनिल जयसिंघानीनं त्याच्या अटके विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई योग्य असल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टानं ती याचिका फेटाळली होती. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रोहित आणि विराट संघाबाहेर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here