मुंबई

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. त्यात खेळाडूंवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. याचा प्रत्यय ‘एमएस धोनी: अन टोल्ड स्टोरी’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’ या चित्रपटांतून आला आहे. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा एका भारतीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारतीय महिला क्रिकेटची ओळख असलेल्या गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. यात झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत अनुष्का शर्मा पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अनुष्का आणि झुलन गोस्वामी या दोघींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात अनुष्का भारतीय संघाच्या जर्सीत झुलन यांच्या लूकमध्ये दिसतेय. मोकळे केस त्यावर टीम इंडियाची कॅप, रांगडा बाणा आणि मनगटात घड्याळ, असा झुलन यांचा लुक हुबेहुब साकारण्याचा अनुष्काने प्रयत्न केलाय.

दरम्यान, बॉलीवूडमध्ये सध्या क्रिकेट विश्वातील खेळाडूंच्या बायोपिकची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेटसाठी परमोच्च क्षण मानल्या जाणाऱ्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयावरही अभिनेता रणवीर सिंगचा ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर या चित्रपटात माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिच्यावरील चित्रपटाचीही निर्मिती केली जात आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here