म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मध्यवर्ती भागाताली रस्ते बस वाहतुकीसाठी सायंकाळी पाचनंतर बंद केले जातात. त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या बस इतर मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.

बस मार्गांतील बदल

– बसचा मार्ग क्रमांक : २, २अ, ११, ११अ, ११क, २१६, २९८, ३५४, मेट्रो १२, १३, २०, २१, ३७, ३८, ८८, २९७, २८, ३०, १० : या मार्गांवरील बस गणेशोत्सव काळामध्ये शिवाजी रस्त्याने येण्यास प्रतिबंध केल्यानंतर जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पुलमार्गे टिळक रोडने स्वारगेट चौकात जातील. टिळक रस्ता बंद केल्यानंतर या बस शास्त्री रोडने दांडेकर पूल येथे येऊन पुढे मित्र मंडळ चौक मार्गे लक्ष्मी नारायण चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील. मात्र, स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध होईपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आता पीएमपीची सीएनजी आणि वातानुकुलीत ई-बस भाड्याने मिळणार; प्रशासनाकडून कराराचे दरपत्रक प्रसिध्द, जाणून घ्या दर
बसचा मार्ग क्रमांक ५५ : या मार्गावरील बस रस्ता बंद असलेल्या काळात शनिपार/मंडईऐवजी नटराज स्थानकावरून सोडण्यात येतील; तसेच या बसचा जाता-येता अंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलिस चौकी असा मार्ग राहील.

– मार्ग क्रमांक : ५८,५९ : या मार्गावरील बस रस्ता बंदच्या काळात डेक्कन जिमखाना स्थानकावरून सोडण्यात येतील.

– मार्ग क्रमांक- ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४क, १४४अ, २८३ : या मार्गांवरील बस पुणे स्टेशनकडून येताना ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार, मनपा भवन बस स्थानक, काँग्रेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बस स्थानक, खंडुजी बाबा चौक येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. हा बदल वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद केल्यानंतरच करावयाचा आहे.

– मार्ग क्रमांक- ९, १७४ : या मार्गाची बस पुणे स्टेशनकडून एनडीए कोंढवा गेटकडे जाताना लक्ष्मी रोड वाहतुकीसाठी बंद केल्यास मॉडर्न बेकरी चौक येथे येऊन डाव्या बाजूस वळण घेऊन सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेट चौकात येतील. जाताना स्वारगेट चौकातून सरळ नेहरू स्टेडियमवरून सारसबाग टिळक रोडमार्गे डेक्कन कॉर्नर येथे जातील.
Pune News: पुण्यातल्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; बाप्पाच्या दर्शनासाठी PMPLचा मोठा निर्णय, पण…
– मार्ग क्रमांक- ७, १९७, २०२ : या मार्गांवरील बसेस रस्ता बंद काळात जाता-येता म्हात्रे पूल मार्गे स्वारगेट शंकरशेठ रोडने सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळुन रामोशी गेट, भवानीमाता मंदिर, महात्मा गांधी स्थानकापुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र, भवानीमाता मंदिराजवळ रस्ता बंद झाल्यानंतर गोळीबार मैदान, महात्मा गांधी स्थानकापुढे जाता-येता नेहमीच्या मार्गाने सुरू राहतील.
विसर्जन मिरवणुकीसाठी ‘जुलूस’ पुढे ढकलला; पुण्यातील भाईचाऱ्याच्या संदेशाची संपूर्ण राज्यभर चर्चा

पर्यायी मार्ग, सुविधा केंद्र; गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here