नागपूर: पावसाच्या हजेरीने जिल्ह्यातील संकटाचे मळभ गुरुवारी आणखी गहिरे केले. यात दिवसभरात करोनाची लागण झालेल्या आणखी १९३४ जणांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतचा बाधितांचा आकडा ४७ हजाराच्या उंबरठ्यावर ४६,४९० पर्यंत धडकला आहे. करोनाची लागण झाल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ५८ जणांनी गुरुवारी दिवसभरात अखेरचा श्वास घेतला. या घडामोडीत १५१३ बाधित आजारमुक्त होऊन घरी परतले. ( )

वाचा:

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये ७०२६ जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यातील ५०९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्याने करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये ४७८ जण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. तर मृतांमध्येही ९ जणांचा समावेश आहे. त्यामुळे करोनाचा विषाणू ग्रामीण भागातही धुमाकूळ घालत असल्याने चिंतेचे मळभ दिवसागणिक गहिरे होत आहे.

वाचा:

आज करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांपैकी खासगी लॅबमधून सर्वाधिक ६९६ आणि मधूनही ६७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान २०१ नमुने मेयोतून, १९७ नमुने मेडिकलमधून, निरीतून९६, माफ्सूतून ५७ तर एम्समधून१७ जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले.
सध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ११८९५ सक्रिय आहेत. त्यातील ६७२८ जणांना विषाणू बाधा झालेली असली तरी कोणतिही लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवले गेले आहे. तर सौम्य, मध्यम आणि तिवृ स्वरुपाची लक्षणे असलेल्या ५१६७ जणांवर कोव्हिड केअर सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत.

वाचा:

गुरुवारी दिवसभरातील स्थिती
पॉझिटिव्ह- १९३४
आजचे आजारमुक्त- १५१३
आतापर्यंतचे पॉझिटिव्ह- ४६४९०
आजवरचे आजारमुक्त- ३३०७९
आजचे निगेटिव्ह- ५०९२
सक्रिय करोना बाधित- ११८९५
जिल्ह्यातील बाधित- ३६८५
गृह विलगीकरणातील रुग्ण- ६७२८

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here