छत्रपती संभाजीनगर: यंदा गणेशोत्सव हे निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनीही शांततेत हा सण साजरा करण्याबाबत निर्देश दिले आहे. या अंतर्गत शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गस्ती पथकांसह दामिनी पथकांचीही संख्या वाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीसह इतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश यांचा दौरा असल्याकारणाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. हा बंदोबस्त आता संपलेला आहे.
लई ‘बेस्ट’! सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी ‘बेस्ट’ रात्रभर धावणार, मुंबईकरांची सोय झाली
सोमवारी (१८ सप्टेंबर) गणेश मुर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. यामुळे सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना गस्त वाढविण्याचे आदेश पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिले आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी यंदा गणेशोत्सवाच्या नियोजनात पोलीस निरीक्षकांना समन्वयक म्हणून काम करण्याची सूचना दिली आहे. गणेश मंडळाच्या समस्या आणि त्यांच्या अडचणीही दूर करण्याचे काम पोलीस निरीक्षकांवर; तसेच संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर देण्यात आले आहे. याशिवाय एक मंडळ-एक गणपतीचे नियोजन केले आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गणेश मंचाचा आकार; तसेच यात पारंपारिक वाद्यांचा उपयोग करण्यावर भर देण्यात येत आहे.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणात बाप्पाचं आगमन

पोलीस आयुकत मनोज लोहिया यांनी गणेशोत्सवाच्या काळात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी शहरात विविध भागात सात दामिनी पथक तयार करण्याचे आदेश दिले आहे. या दामिनी पथकांच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. याशिवाय अन्य पथकेही वाढविण्यात आलेले आहेत. शहरात गणेशोत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तासह राज्य राखीव पोलीस दल, होमगार्डची संख्याही वाढविण्यात येणार आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here