मुंबई : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना धनगर समाजाने देखील आरक्षणप्रकरणी कठोर भूमिका घेत जाट समाजापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देणारं पत्र धनगर समाजाचे नेते तथा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र पडळकरांनी पत्र लिहिलेलं नाहीये. हाच प्रश्न पडळकरांना विचारला असता, “अजित पवार म्हणजे लांडग्याचं पिल्लू आहे. धनगर समाजाबद्दल त्यांची भावना चांगली नाहीये. त्यांना आम्ही मानत नाही”, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. एकमेकांसोबत सत्तेत सहभागी असतानाही पडळकरांनी अजित पवार यांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवार गट मात्र चांगलाच आक्रमक झाला असून दिसेल तिथे ठोकून काढू, अशी पवित्रा दादा गटाने घेतला आहे.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सर्वच घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने जसं अनेकांना फसवलं, तसं धनगर समाजाला देखील आरक्षण देतो म्हणून फसवलं, अशा शब्दात त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. या साऱ्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पवार कुटंबातील स्वत: शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सत्ता येत जात राहते-देश महत्त्वाचा, नेहरूंपासून मनमोहन सिंगांच्या योगदानाला नमन, मोदी काय काय म्हणाले?
अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू

अजित पवार यांची धनगर समाजाबद्दल भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे. धनगर समाजाने आतापर्यंत तुमच्या पालख्या उचलल्या लोकांच्या चपला फाटल्या तरीही तुमच्या बापाने, भावाने पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिलं नाही. त्यामुळे तुम्हाला आता धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आरक्षणावर काम करतायेत. येत्या दोन महिन्यात आरक्षणप्रकरणी निकाल येईल, असं पडळकर म्हणाले.

स्वत:ला मोठा नेता म्हणताय, पक्ष फोडलात, आता हे पाप तरी करू नका, वडेट्टीवारांचा संताप, अजितदादांना सुनावलं
सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा अजित पवारांना मी काडीचीही किंमत देत नाही

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा अजित पवार काय बोलले, याला मी काडीचीही किंमत देत नाही. आरक्षणप्रश्नी त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असते. त्यामुळे त्यांच्याकडून मला किंवा धनगर समाजाला काडीचीही अपेक्षा नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

अजित पवारांवर टीका; ‘पडळकरांना कुत्र विचारत नाही’, म्हणत रुपाली पाटलांनी घेतला चांगलाच समाचार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here