नागपूर: महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी आज नागपूरकरांचा निरोप घेतला. ‘काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यातच बदली झाली. आता नियमानुसार माझ्या मार्गानं निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा,’ अशी अपेक्षा त्यांनी नागपूरकरांकडून व्यक्त केली आहे.

मागील सात महिने तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांच्या अनेक निर्णयांना राजकीय पक्षांचा विरोध झाला. मात्र, नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहिले. कोविड काळात सतत फिल्डवर असलेल्या मुंढेंना काही दिवसांपूर्वी करोनाने गाठले होते. ते होम क्वारंटाइन असतानाच त्यांची बदली झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काल ती बदलीही रद्द झाली आहे. मात्र, करोनामुक्त झालेल्या मुंढेंनी नागपूरकरांना अलविदा केले आहे. फेसबुकवर व्हिडिओ टाकून सहकार्याबद्दल नागपूरकरांचे आभार मानले आहेत.

वाचा:

‘नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी आपला निरोप घेत आहे. या सात महिन्यात या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. या काळात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरू आहेत. काही अजून सुरू झालेले नाहीत. हे सगळं होत असतानाच माझी बदली झाली. आता, ‘मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार पुढील कामकाजासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

आपल्या सर्वांचं प्रेम, सहकार्य लाभलं. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकलो की नाही माहीत नाही. पण माझा प्रयत्न १०० टक्क्यांहून अधिक होता. काही गोष्टी निश्चित करू शकलो. कोविड महामारी आणि अतिक्रमणांच्या बाबतीतही काम झालं. कोविड काळात नागपूरकरांनी आरोग्याच्या दृष्टीनं पूर्ण काळजी घेतली तर आपण निश्चितच त्यावर मात करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरला एक राहण्यायोग्य आणि व्हायब्रंट शहर करायचं होतं, पण पुरेसा वेळ न मिळाल्यानं ते करू शकलो नाही. जे काही करता आलं, त्यात आपलं सहकार्य मोलाचं होतं. आपल्यामधील ऋणानुबंध असेच कायम राहतील. अधिक दृढ होती, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सात महिन्यात मी सात पावलं टाकली, तुम्हीही तीन पावलं टाका. शासन, प्रशासन आणि नागरिक सर्वांनी एकत्र येऊन पुढं जायला हवं. जड अंत:करणानं येथून जात आहे. पण नागपूरकरांसोबत कायमस्वरूपी असेन. तुमच्याही हृदयात माझं स्थान असू द्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here