चेन्नई : सिनेसृष्टीतून अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. साउथ अभिनेते विजय अँटोनी यांच्या १६ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास पहाटे ३ च्या सुमारास तिने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

संगीत दिग्दर्शक ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास केलेला अभिनेता विजय अँटोनी यांची मुलगी मीरा हिने मंगळवारी पहाटे चेन्नई तेनमपेट येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. चेन्नईतील एका खासगी शाळेत ती इयत्ता १२वीत शिकत होती. विजय अँटोनी आणि त्यांची पत्नी फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली होत्या.

गो गोवा गॉन, एक व्हिलन सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास विजय आपल्या मुलीच्या मीराच्या खोलीत गेले होते. त्यावेळी त्यांनी लेकीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवून कावेरी रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिला मृत घोषित करण्यात आलं.

रत्नागिरीतील मूळ गावी नितीन देसाईंच्या अस्थि कलशाचे विसर्जन, भाऊ आणि काकांनी व्यक्त केल्या भावना!

विजय यांची मुलगी इयत्ता १२वीत शिकत होती. १२ वीची विद्यार्थिनी असलेली मीरा तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला आहे.

कोणलाही या घटनेवर अद्याप विश्वास बसत नाही. इतक्या लहान वयात अभिनेत्याच्या लेकीने आयुष्याचा शेवट का केला असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक लोक विजय यांच्या घरी पोहोचत आहेत. अभिनेते विजय यांच्या काही जवळच्या लोकांनी सोशल मीडियावरुन या घटनेची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here