पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात जन यात्रा काढून आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. किल्ले शिवनेरी येथून त्यांनी नुकतीच जण संवाद यात्रा पार पाडली. या मतदार संघात जानकर यांना जवळपास सव्वा लाखाहून त्यांच्या समाजाचे मतदान आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…

महादेव जानकर यांनी २०१४ साली बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. अत्यंत कमी फरकाने त्यांचा या मतदार संघात पराभव झाला होता. त्यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलाच घाम फोडला होता. तसेच दौंडमध्ये त्यांच्या पक्षाकडून राहुल कुल सारखा नेता देखील निवडून आला होता. जानकर हे भाजपसोबत जाऊन त्यांनी सत्तेत सहभागी झाले होते. मात्र, आता त्यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ते प्रत्येक मतदार संघात आपला उमेदवार देणार असल्याची घोषणा देखील केली आहे.

फडवणीसांचे निष्ठावंत, रासपच्या एकमेव आमदाराला भाजपनेच घेरलं; गुट्टेंच्या मतदारसंघात काय घडलं?

महादेव जानकर यांनी आतापर्यंत शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा कधीही केला नव्हता. तसेच जनसंवाद यात्रा देखील काढली नव्हती. मात्र, त्यांनी या मतदार संघात जनसंवाद यात्रा काढत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मतदार संघात आपल्याला चांगले मताधिक्य मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जर जानकर या मतदार संघातून लढले तर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील किंवा आणखी नवीन जो उमेदवार येईल त्याला निश्चितच धक्का बसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. महादेव जानकर यांच्या शिरूर लोकसभेच्या एन्ट्रीने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.

काँग्रेस,भाजपने मराठा समाजाचा सत्यनाश केला, रासपचं सरकार आणा आरक्षण देऊ | जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here