नवी दिल्ली : खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) सर्वेसर्वा याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. या हत्या प्रकरणात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारातवर सनसनाटी आरोप केला. या गोळीबारामागे भारताचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. पण भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, कॅनडाने सोमवारी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एका उच्चपदस्थ भारतीय उच्च पदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या पाऊलामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. कॅनडानं भारतीय उच्चाधिकाऱ्याला हटवल्यानंतर आता भारतानेही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार भारतातील कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्याची देखील हाकालपट्टी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here