किशोर पाटील, जळगाव : शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराध्याला शिक्षा होऊ नये. न्यायदानासंदर्भातील या वाक्यानुसार विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा होऊ नये, असं न्यायदानासंदर्भात एक वाक्य आहे.. त्यानुसारच विधानसभेचे अध्यक्ष सत्ता संघर्ष बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील ४० आमदार हे सुरक्षित आहेत हे सांगताना शिवसेनाही आमचीच आहे.. शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केलं आहे, असं किशोर पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे व त्यांचे १४ आमदार हे शिवसेनेतून बाहेर असल्यामुळे कारवाई होणारच असेल तर त्यांच्यावर होईल असं मत देखील यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केल आहे.

शिवसेना आमचीच आहे आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही, ,त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय देखील आमच्या बाजूने लागेल असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai News: गंज काढणारी गाडी कारशेडमध्ये, भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला वेग; मुंबईकरांना अच्छे दिन
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता आणि फ्लोअर टेस्टला ते सामोरे गेले असते आणि या ठिकाणी जर आम्ही चुकीच्या बाजूने मतदान केलं असतं तर आमच्यावर कारवाई झाली असती. तर ते आम्हाला मान्य असते असंही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे..
पवार घराण्यावर तोंडसुख घेणं पडळकरांना महागात पडलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं काल झालेल्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ११ मे रोजी निकाल लागल्यानंतर महिने उलटले तरी या प्रकरणात काहीच झालेलं नाही. तुम्ही दहाव्या अनुसूचीसंदर्भातील कारवाई अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
Nari Shakti Vandan Adhiniyam: पंतप्रधान मोदींकडून नव्या संसदेत नारीशक्ती वंदन विधेयकाची ऐतिहासिक घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here