म. टा. प्रतिनिधी, पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) पुढील वर्षी होणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसह (नीट) होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जेईई दोन टप्प्यात होणार असून, ऑनलाइन परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर तीन आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे, असी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे. जेईईचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत, तर नीट परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी एनटीएकडून दरवर्षी काही महिने आधी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. एनटीएच्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीच्या जेईई परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे, तर दुसरा टप्पा १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा ५ मे रोजी नियोजित आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निकाल आमच्याच बाजूनं येणार, एकनाथ शिंदे समर्थक आमदाराचा दावा, म्हणाले..
देशभरातील केंद्रीय, सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) १५ ते ३१ मे दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा सीयूईटी-पीजी ११ ते २८ मार्च या कालावधी घेण्यात येणार आहे. परीक्षांबाबतची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन परीक्षांचे सर्व निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यांमध्ये जाहीर केले जाणार आहेत. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एनटीएच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Nari Shakti Vandan Adhiniyam: पंतप्रधान मोदींकडून नव्या संसदेत नारीशक्ती वंदन विधेयकाची ऐतिहासिक घोषणा

देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा यूजीसी नेट ही १० ते २१ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा असल्याने, परीक्षेची अनेक उमेदवार वाट पाहतात. त्यामुळे एनटीएने वेळापत्रक प्रसिद्ध करून दिलासा दिला आहे.
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मांडलं, अंमलबजावणी कधीपासून होणार?

जालन्यात स्थापन होणार चांदीची गणेशमूर्ती, साकारण्यासाठी लागला पाच महिन्याचा कालावधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here