अत्याधुनिक ड्रोनचा वापर:
सुरक्षा दलांच्या म्हनण्यानुसार हे आतापर्यंतचे सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत ऑपरेशन आहे ज्यामध्ये बगळा ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाचावर आधारित रोबोटचा वापर केला जात आहे. बुधवारी झालेल्या हल्ल्यात दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जम्मू काश्मीर पोलीसमधील एक अधिकारी मारले गेले. या अधिकाऱ्यांची ओळख पटली असून १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर मनप्रीत सिंग, त्याच युनिटचे मेजर आशिष धोनचक आणि जम्मू काश्मीरचे पोलीस डीएसपी हूमायून मुझम्मील भट अशी त्यांची नावे आहेत. यासोबतच बेपत्ता असलेले आणखी एक सैनिक प्रदीप कुमार यांचाही मृतदेह मिळाला आहे.
उपराज्यपाल सिन्हा यांची शहीद भट यांच्या घरी भेट:
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या हूमायून भट यांच्या बडगाम येथील हूमहामा येथील घरी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भट कुटूंबियांप्रती शोक व्यक्त केला. तसेच प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन दिले. यावेळी सिन्हा म्हणाले की, संपूर्ण देश शूर व्यक्तीच्या कुटूंबियासोबत उभा आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार:
खबरदारीचा उपाय म्हणून नागरी भागात अतिरेकी घुसू नयेत यासाठी शेजारच्या भागात सुरक्षा कवच वाढवण्यात आले आहे असे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले.शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला