पिंपरी : पुणे आणि परिसरात विनापरवाना राहणारे बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड येथील मोशी परिसरातील बोऱ्हाडेवाडी येथे राहत असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी पथकाने अटक केली आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

सुकांथा सुधीर बागची (वय २१), नयन बिंदू बागची (वय २२), सम्राट बलाय बाला (वय २२, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र, परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहशतवादी पथकाला माहिती मिळाली होती की, पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागातील बोऱ्हाडेवाडी येथे असणाऱ्या एका बांधकाम साईटवर काही नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे. त्यात तीन बांगलादेशी नागरिक या ठिकाणी बेकायदेशीर रहात असल्याचे निदर्शनास आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भारतात वास्तव्यास असलेली कोणतीही वैद्य कागदपत्रे उपलब्ध नव्हती.

अवघ्या ३ सेकंदांचा अपघात, मुलगा ब्रेन डेड; कुटुंबाचा एक निर्णय देणार ७ जणांना जीवनदान

हे तिघेजण भारत आणि बांगला देश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या कोणत्याही परवानगीशिवाय ते घुसखोरी करून भारतात वास्तव्यास अलेल्याचे त्यांचेकडे केलेल्या चौकशीत समोर आले आहे. हे तिघेजण बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साईटवर काम करत होते.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून तिघांकदून देखील बांगलादेशी चलन, भारतीय तीन आधार कार्ड, पॅनकार्ड, आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठ येथे देखील बेकायदेशीर रहात असलेल्या बांगला देशी महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता मोशीत ही कारवाई करण्यात आली आहे.

२४व्या मजल्यावरुन पडून १७ वर्षीय मुलाचा पडून मृत्यू; घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here