‘आयएसआय’वर फोडले खापर
‘पाकिस्तानची अशी अवस्था करणारे सर्वांत मोठे गुन्हेगार असून, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटच्या सरकारने देशाला दिवाळखोरीपासून वाचवले; अन्यथा पेट्रोलचे प्रतिलिटर दर हजार रुपयांवर गेले असते. पाकिस्तानच्या या स्थितीला प्रामुख्याने माजी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा, ‘आयएसआय’चे माजी प्रमुख फैझ हमीद आणि माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार ही मंडळी जबाबदार आहेत,’ असेही शरीफ यांनी नमूद केले.
पाकिस्तानची जनता उपाशी
‘पाकिस्तानची जनता अन्नपाण्यासाठी झगडत आहे. काही विशिष्ट मंडळींनी देशाची अवस्था इतकी बिकट केली आहे. २०१७मध्ये अशी अवस्था नव्हती. तेव्हा तेल, साखर आणि गव्हाच्या पीठाचे भाव आवाक्यात होते. विजेचे बिलही आवाक्यात होते. आता किरकोळ वापराचे वीजबिलही ३० हजारांच्या घरात येते. बिल भरण्याचीही जनतेची ऐपत राहिली नसून, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे,’ या शब्दांत शरीफ यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले.
माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पाकिस्तान प्रगती करीत होता. ते न बघवल्यामुळे कोर्टाने मला २७ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे माझ्यावर परागंदा होण्याची वेळ आली. या सर्व प्रकारामागे जनरल बाजवा आणि जनरल फैझ यांचा हात आहे.
– नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान, पाकिस्तान
भारताच्या अर्थनीतीचे कौतुक
साधारणत: नव्वदच्या दशकात भारताने अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली. त्यांची अर्थवस्था आज ब्रिटनला मागे टाकून पाचव्या स्थानी पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताकडे एक अब्ज डॉलरही नव्हते, मात्र आज त्यांच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत ६०० अब्ज डॉलरचा निधी आहे,’ या शब्दांत शरीफ यांनी भारताचे कौतुक केले.