म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांना सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याच्या निर्णय प्रक्रियेत तरूण मतदारांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांची मतदार यादीत नोंद आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केल्यास राज्यातील अठरा वर्षांवरील सर्व तरुण पिढीला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य होईल. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मतदार यादीत आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे. या कामामध्ये महाविद्यालये चांगल्याप्रकारे भूमिका बजाऊ शकतात.

मुरलीधर मोहोळ यांच्या गणेशोत्सव मंडळात यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा

या पुरस्कार योजनेत भाग घेण्यासाठी गुगल फॉर्मवर १५ डिसेंबरपर्यंत आवश्यक माहिती भरायची आहे. यामध्ये महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या, १ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, मतदार जागृतीसाठी महाविद्यालयाने राबवलेले उपक्रम तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत मतदार जागृतीसाठी राबवलेले उपक्रम आदींची माहिती भरावयाची आहे. महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी democracybook2022@gmail.com या ई-मेल आयडीवर पत्त्यावर संपर्क साधावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

लोकसभा निवडणूक वेळेवर होणार पण महाराष्ट्रात मध्यावधी लागणार, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here